साळशिंगी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सोनल जितेंद्र गायकवाड यांची बिनविरोध निवड

 


 बोदवड (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत साळशिंगी येथे वयाच्या 22 व्या वर्षी उपसरपंच पदी सोनल जितेंद्र गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.[ads id="ads1"] 

   सोनल गायकवाड यांनी साळशिंगी (Salsingi) ग्रामपंचायत कार्यालय येथील उपसरपंच खुर्चीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा ठेवून त्यांच्या विचाराने कार्य करण्यात येईल असे त्यांनी सुवर्ण दिप न्युज शी बोलताना सांगितले. [ads id="ads2"] 

बोदवड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मताधिक्य सोनल जितेंद्र गायकवाड यांना पडले होते. तसेच गरीब वंचित घटकांना समान न्याय, योजना संदर्भात मार्गदर्शन देण्यात येईल अस नवनिर्वाचित उपसरपंच यांनी सांगितले.

       सदर निवडणुकीत सरपंच सोनाली राजेंद्र पाटील, ग्रा.सदस्य राहुल पाटील,ग्रा.सदस्य विनोद काळबैले,ग्रा.सदस्य गायकवाड,ग्रा.सदस्य संगीता बिजागरे, ग्रा.प.सदस्य जंगलु मोरे व मनीषा महाजन आदी उपस्थित होते.

 सोनल जितेंद्र गायकवाड यांची उपसरपंच निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️