दुचाकीची वॉशिंग करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू ; जळगावातील बी.जे.मार्केट परिसरातील घटना


जळगाव : दुचाकी धुत असताना अचानक विजेचा शॉक लागून तौफिक अफजल भिस्ती (२०, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगावातील बी. जे. मार्केट (B.J.Market,Jalgaon) परिसरात घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांसह नातेवाईकांनी  जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital Jalgaon)  प्रचंड गर्दी केली होती.[ads id="ads1"] 

नातेवाईकांनी दिलेली माहितीनुसार, जळगाव शहरातील (Jalgaon City)  पिंप्राळा हुडको परिसरात तौफिक हा कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. त्याचे वडील मिस्तरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तौफिक हा लहानपणापासून जळगावातील  बी. जे. मार्केट (B.J.Market,Jalgaon)  परिसरातील वॉशिंग सेंटरवर काम करीत होता. [ads id="ads2"] 

  शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तौफिक आपल्या इतर तीन सहकाऱ्यांसोबत दुचाकी (Two Wheeler) ची वॉशिंग करत असताना त्याला अचानक विजेचा शॉक लागल्याने तो जमिनीवर कोळसला.

हेही वाचा :- अंतुर्ली खुर्द येथील ५२ वर्षीय इसमाचा सर्प दंशाने मृत्यू 

   तौफिकला शॉक लागल्याचे कळताच त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकारी अनस, अबरार यासिर यांच्यासह मालक आसिफ भिस्ती यांनी त्याला दुचाकीवरून तात्काळ जळगाव जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले. त्याच्या पश्चात आईवडील, दोन लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️