अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार कार्यकर्ते व मित्र परिवाराकडून पुढील 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार कार्यकर्ते व मित्र परिवाराकडून पुढील 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मातोश्री स्व.इंदिरामाई कडू यांच्या निधनामुळे सर्व प्रहार परिवार दुःखात असून तसेच बच्चू भाऊ कडू यांचा सेवेचा वारसा पुढे नेत  वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन जळगांव जिल्हाप्रमुख (युवा) अविनाश भाऊ पाटील यांनी केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

दि.21 मार्च सोमवार रोजी सिंदखेड ता.रावेर येथील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रहार ता.युवा उपाध्यक्ष राजू भाऊ पाटील यांच्या सहकार्याने वही व पेन वाटपाचा कार्यक्रम सकाळी ठीक 10 वाजता[ads id="ads2"] 

दि.22 मार्च मंगळवार रोजी निंबोल(नवीन) ता.रावेर येथील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रहार ता.युवा सचिव मच्छिन्द्र कोळी,ता.युवा उपाध्यक्ष भगवान कोळी व प्रहारसेवक पत्रकार विनोद कोळी यांच्या सहकार्याने वही व पेन वाटपाचा कार्यक्रम सकाळी ठीक 10 वाजता.

तसेच दि.24 मार्च गुरुवार रोजी सुपर बॅटरी रावेर येथे निराधार व गरजू कुटुंबातील व्यक्तींना किराणा किट वाटपाचा कार्यक्रम सुपर बॅटरी चे मालक इम्रान सेठ यांच्या सहकार्याने ठीक 10 वाजता पार पडेल.

सर्व कार्यक्रम युवा जिल्हाप्रमुख अविनाश भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत होतील तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व मित्रपरिवाराने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने ता.युवा प्रमुख योगेश निकम यांनी केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️