राज्यात एकूण 26 परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती ; यावल नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून मनोज म्हसे

 


जळगाव जिल्ह्यात नशिराबाद, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती

यावल (सुरेश पाटील) राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्गातील कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी गट- ब संवर्गात मर्यादित विभागीय परीक्षेच्या गुणवत्तेनुसार परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी गट ब पदावर ऑन फील्ड ट्रेनिंग स्वरूपात एकूण 26 जणाची महाराष्ट्र राज्य शासनाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी दि. 16 मार्च 2022 रोजी एका लेखी आदेशान्वये नियुक्ती केली आहे. [ads id="ads1"] 

  यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात यावल नगरपरिषद परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून मनोज जनार्दन म्हसे तसेच नशिराबाद नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून रविंद्र रघुनाथ सोनवणे यांची नियुक्ती केली आहे. [ads id="ads2"] 

        महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी दि. 16 मार्च 2022 रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालय आयुक्त तथा संचालक,सर्व विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, संबंधित जिल्हाधिकारी,संबंधित नगरपरिषदा,नगरपंचायतीचे नगराध्यक्ष,संबंधित मुख्याधिकारी, सर्व संबंधित प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन मुख्याधिकारी गट ब यांना दिलेल्या लेखी आदेशात नमूद केल्याप्रमाणे यावल नगरपरिषद परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा,श्रेणी- ब (गट-क)मधील मनोज जनार्दन म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी तात्काळ रुजू व्हावे असे म्हटले आहे.याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यात नशिराबाद नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून रविंद्र रघुनाथ सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून चेतन सुधाकर विसपुते,पुणे जिल्ह्यात मंचर नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून मनोज काशिनाथ पष्टे, उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग नगर परिषद मुख्याधिकारीपदी लक्ष्मण बसवराज कुंभार, अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार येथे आशिष भगवान घोडे,नांदेड जिल्ह्यात मुखेड येथे धनंजय नानासाहेब थोरात,अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव येथे ऋषिकेश बाबुराव भालेराव,नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर येथे शामकांत गजमल जाधव,बिलोली येथे अमोल अशोक चौधरी, उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथे अरविंद आनंद नातू, रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे प्रमोद संपतराव ढोरजकर,बीड जिल्ह्यात किल्लेधारूर येथे विशाल साहेबराव पाटील, रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे प्रशांत राम भोसले,वर्धा जिल्ह्यात सिंधी येथे सतीश प्रकाश शेवदा, नांदेड जिल्ह्यात उमरी येथे गणेश रामचंद्र चाटे,परभणी जिल्ह्यात पूर्णा येथे अजय अर्जुन नरळे, अमरावती जिल्ह्यात धारणी येथे हर्षल गुलाब सोनवणे,गोंदिया जिल्ह्यात आमगाव येथे ऋषिकेश सतीश देशमुख,नागपूर जिल्ह्यात भिवापूर येथे श्रीमती कोमल संभाजी सावरे,चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड येथे राहुल दिलीप कंकाळ,लातूर जिल्ह्यात जळकोट येथे चेतंकुमार धानाप्पा माळी, सोलापूर जिल्ह्यात अनगर येथे अनुप श्रीराम अग्रवाल,वाशीम जिल्ह्यात मानोरा येथे प्रणव शंकरराव तांबे,चंद्रपूर जिल्ह्यात भिसी येथे पंकज प्रभाकर सोनुने, गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथे विजयकुमार लालूराम आश्रमा अशाप्रकारे राज्यात एकूण 26 परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी पदावर प्रस्तावित पदस्थापना नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासनाचे अवर सचिव यांनी संबंधितांना लेखी आदेशान्वये कळवून तात्काळ रुजू व्हावे असे कळविले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️