Raver : धामोडी शिवारात बिबट्यासह दोन बछड्याचे दर्शन झाल्याने शेतमजूर भितीने माघारी परतले घरी

 


रावेर प्रतिनिधी ( समाधान गाढे) रावेर तालुक्यातील  धामोडी (Dhamodi)  शिवारात बिबट्यासह दोन बछडे असल्याचे स्थानिक शेतकरी माणिक रामा पाटील यांना शेतात सकाळी सकाळी  कामावर आल्यावर दिसले. बिबट्या आणि बछडे दिसल्याची माहिती त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिल्याने शेतमजूर भितीपोटी माघारी परतले.[ads id="ads1"]

 शेतकरी माणिक रामा पाटील यांना सकाळी आपल्या  हरभरा, केळी असलेल्या शेती परिसरात दोन लहान पिले व एक मोठा बिबट वावर करतांना दिसल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे कामावर असलेल्या महिला मजूर शेतकरी आप आपले साहित्य घेवून भीतीपोटी घरी परतले. [ads id="ads2"]

  घटनेची माहिती रावेर वनविभाग (Raver Forest) यांना दिली असता वनपाल अतुल तायडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पथकावर पगमार्ग बघितले असता तो बिबट असल्याचे प्राथमिक माहितीत समजले मात्र नर किंवा मादी असल्याचे कोणताही अंदाज लावता आला नाही.

दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जावे की नाही असा प्रश्न व्यक्त केला जात आहे. पाच दिवसापूर्वी दोन किमी अंतरावर कांडवेल (Kandwel) शेती शिवारात बिबट्याने दोन बोकड फस्त केले होते. सदर गावात एकच चर्चा असल्याने वाघ आला, पळा पळा असा उदघोष सगळ्यांच्याच तोंडी होता. तापी नदीच्या किनारी गावामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच हिंस्त्र प्राणी शेती शिवारात वास्तव करत असतात. पुरी, गोलवाडे, कांडवेल , धामोडी, शिंगाडी या परिसरात वन्य प्राणी शेती पिकाचे नुकसान करतात. वनविभागाने याबाबत कोणतीही जनजागृती केलेली दिसत नाही.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️