मुक्ताईनगर प्रतिनिधी (समाधान गाढे) मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली (Chikhali) येथील रेशनदुकान धारकाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात (Muktainagar Police Station) रेशन दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
गरीबांच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री Muktainagar तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक अजबराव सीताराम पाटील (रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 या काळात लाभार्थीसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते. [ads id="ads2"]
पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी 70 क्विंटल गहू, 36 क्विंटल तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक करण्यात आली. याबाबत मुक्ताईनगर (Muktainagar ) पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी गावडे (27) यांच्या फिर्यादीवरून रेशन दुकानदार आजाबराव सीताराम पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे.