सहा महिने लोटूनही यूडीआयडी कार्ड घरी येईना ;दिव्यांगांना नाहक त्रास

 

सहा महिने लोटूनही यूडीआयडी कार्ड घरी येईना ;दिव्यांगांना नाहक त्रास

केंद्राचे काम संथगतीने; वारंवार होते विचारणा

दिव्यांगांचे सक्षमीकरण, शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी आवश्यक दिव्यंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र व वैयक्तिक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) केंद्र शासनातर्फे घरपोच पाठवण्यात येते. ऑनलाइन प्रक्रियेमुळे तपासणीनंतर दहा दिवसात ऑनलाइन प्रमाणपत्र रुग्णांना मिळत असले तरी युडीआयडी कार्ड (UID Card) मात्र सहा महिने उलटूनही मिळत नाही.[ads id="ads1"] 

  दिव्यांगत्त्वाच्या विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव (Jalgaon) येथे तज्ञ डॉक्टरमार्फत दिव्यंगत्व तपासणी व निदान करुन ऑनलाइन प्रमाणपत्र (Certificate)  दहा दिवसात देण्यात येते. मात्र, दिव्यांगत्वाचे कायमस्वरूपी असलेले युडीआयडी कार्ड दिल्ली येथून वितरित करण्यात येते. [ads id="ads2"] 

   प्रमाणपत्र तयार झाल्यांनतर सहा महिने उलटूनही हे कार्ड रुग्णांना मिळत नसल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील हजारो रुग्णांचे हे कार्ड अद्याप घरी आले नसल्याने रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेण्यासाठी येत आहेत. परंतु, ते मिळत नसल्याने माघारी लागते आहे. दिव्यांगत्व प्रमानपत्र (Disabilty Certificate)  तसेच वैयक्तिक ओळखपत्र ( I Card) मिळवण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता खासदारांनी त्यात लक्ष घालून निर्धारित वेळेत कार्ड देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️