बाथरूममध्ये असलेल्या गॅस गिझरमध्ये गळती होऊन जीव गुदमरल्याने रश्मी पराग गायधनी (वय-49) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. [ads id="ads2"]
नाशिकमध्ये तब्बल पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गॅस गिझरने एका महिलेचा जीव घेतल्याची दुर्घटना समोर आली आहे. ( Death Due to Gas Geyser ) गॅस गिझरच्या गळतीमुळे पायलट महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना नाशिकमध्ये घडली. ( Gas Geyser Accident Nashik ) रश्मी गायधनी असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक ( Air India Female Pilot Nashik ) म्हणून कार्यरत होत्या.
बाथरुममध्ये आढळल्या बेशुद्धावस्थेत -
बाथरूममध्ये अंघोळी करता गेलेल्या रश्मी यांच्या नाका तोंडात गॅस गिझरमधून गळती झालेला गॅस गेल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सरकारवाडा पोलिसांनी वर्तवला आहे. रश्मी गायधनी या मुंबईच्या रहिवासी होत्या. त्या नाशिकला आलेल्या होत्या. नाशिक येथील ज्येष्ठ लेखिका सुमनमुठे आणि सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती मुठे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे श्वास गुदमररून मृत्यू झालेल्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तब्बल पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गॅस गिझरने एका महिलेचा जीव घेतला. बाथरूममध्ये असलेल्या गॅस गिझरमध्ये गळती होऊन जीव गुदमरल्याने रश्मी पराग गायधनी (वय-49) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रश्मी गायधनी या 49 वर्षाच्या होत्या. त्या एअर इंडियामध्ये ज्येष्ठ वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. 5 फेब्रुवारी संध्याकाळच्या सुमारास बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या रश्मी यांना त्यांच्या कुटुंबीयांनी उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.