Raver : विना परवाना गौण खनिजचे ट्रॅक्टर पकडले ;महसुलच्या महिला पथकाची कामगिरी

Raver Mahsul Mahila Pathak

 रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) : रावेर येथील तहसील कार्यालयामध्ये (Raver Tahsil Office)  दि. २२ फेब्रुवारी रोजी Raver तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी वसूली संदर्भात रावेर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांची जम्बो बैठक गेली घेतली होती.[ads id="ads1"] 

   दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेली बैठक रात्री आठ वाजेपर्यंत वसुली आणि विना परवाना गौण खनिज वाहतूक करणारी वाहने व इतर कारवायां संदर्भात तलाठी (Talathi)  व मंडळाधिकारी (Circle) यांचे पथक निर्माण करून पहिल्यांदाच गौण खनिज कारवायांसाठी महिलांचे पथक निर्माण केले होते. या पथकाने (दिनांक २६) रोजी कारवाई केली आहे.[ads id="ads2"] 

   दरवेळेस पुरुष आणि महिला कर्मचारी सोबत अवैध गौण खनिज कारवाया करतात परंतु महिला सुद्धा गौण खनिज कारवाया करू शकतात असा विश्वास रावेर तहसीलदार (Raver Tahsildar Usharani Devgune) यांना होता. त्यासाठी त्यांनी महिला पथकाला कारवाया करण्यासंदर्भात सक्त ताकीद दिली होती. 

हेही वाचा :- एकाच कुटुंबातील ४ जणांना जेवणामधून विषबाधा, तीन बालकांचा मृत्यू ; आईची मृत्यूशी झुंज ! 

त्या आदेशानंतर महिला पथकाने मिळालेल्या माहितीनुसार लोहारा येथे गौण खनिज वाहतूक सुरू असल्याचे कळाले म्हणून या महिला पथकाने दि. २६ रोजी सकाळी चार वाजता लोहारा या गावी आपला मोर्चा वळवला आणि सुकी नदीमध्ये सकाळी पाच वाजता अंधारातच गौण खनिज भरत असलेले ट्रॅक्टर पकडून त्याच्यावर कारवाई केली.

हेही वाचा :- तमाशा मंडळातील तरुण-तरुणीच्या आत्महत्येने खळबळ 

  या कारवाईने एकच खळबळ उडाली आणि सदरचे वाहन रावेर येथील तहसील कार्यालयात जमा केले महिला पथकाची ही पहिलीच कारवाई असल्याने त्यांचे रावेर च्या तहसीलदार उषाराणी देवगुणे (Raver Tahsildar Usharani Devgune)  आणि नायब तहसीलदार संजय तायडे (Nayab Tahsildar Sanjay Tayade) यांचेसह  मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अभिनंदनाचा वर्षाव  केला आहे.

हेही वाचा :- ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी व संध्याकाळी ओ पि डी अखेर सुरू .... ग्रामपंचायत ऐनपुर सरपंच अमोल महाजन यांच्या प्रयत्नामुळे यश 

या पथकात मंडळ अधिकारी खिर्डी (Khirdi Circle) च्या मिना तडवी, चिनावल च्या तलाठी लिना राणे, लोहारा तलाठी खुरशाद तडवी विवरा खुर्द च्या तलाठी रेखा जोरावर (Vivare Khurd Talathi)  या महिला पथकाने विनापरवाना गौणखनिज वाहतूक करणारे वाहन पकडून Raver तहसील कार्यालयात जमा केले. सदर कारवाईत महिला पथकास वाहन रावेर तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल, रावेर, निंभोरा बु, तलाठी रावेर यांनी सहकार्य केले.या कारवाईमुळे वीणा परवाना गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️