डुडीवाला किशनपुरा गावचे रहिवासी ३५ वर्षीय प्रवीण कुमार हे भारतीय लष्करात २२ सिग्नल रेजिमेंट मेरठमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ते रजेवर घरी आले होते आणि ५ फेब्रुवारीला परतणार होता. मात्र एक दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रवीणच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले होते. [ads id="ads2"]
रात्रीचे जेवण करून ते झोपले होते आणि सकाळी उठल्यावर त्यांना चक्कर येत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
फौजीची पत्नी मनिषा आणि तिचा प्रियकर दीपक उर्फ विकी याच्यासोबत मिळून पतीच्या खुनाचा कट रचला होता. मनीषाने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि रात्री उशिरा दोघांनी गळा दाबून फौजी प्रवीणची हत्या केली. पत्नी मनीषा आणि तिचा प्रियकर त्याच गावातील दीपक उर्फ विकी यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयात हजर करून कोठडी सुनावली आहे. चौकशीत त्यांनी जवानाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिस अनेक पैलूंवर तपास करत असून दोघांची चौकशी सुरू आहे.