ऑनलाइन सोफासेट विक्री करण्याच्या नादात आयटी इंजिनिअरची फसवणूक

ऑनलाइन सोफासेट विक्री करण्याच्या नादात आयटी इंजिनिअरची फसवणूक

जळगाव :  आयटी (IT) इंजिनिअरने ओएलएक्सवर (OLX) सोफा विक्रीसाठी फोटो टाकला. एका भामट्याने फोन करून १२ हजार रुपयांत व्यवहार ठरवला. त्यानंतर भामट्याने क्यूआर कोड (QR Code) पाठवून इंजिनिअरच्या (Engineer) खात्यातून ७१ हजार रुपये परस्पर वळते करून घेतले. हा प्रकार ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडला. [ads id="ads1"] 

  विशाल अशोक जाधव (वय ३५, रा. गणेश कॉलनी) यांची फसवणूक झाली आहे. जाधव हे आयटी इंजिनिअर (IT Engineer)आहे. त्यांना जुना सोफा विक्री करायचा होता. त्यांनी ओएलएक्सवर सोफ्याचे फोटो टाकले. काही वेळात त्यांना ७३८१५३७०५० या क्रमांकावरून फोन आला. भामट्याने सोफा खरेदीची तयारी दाखवली १२ हजार रुपयांत व्यवहार ठरला.[ads id="ads2"] 

   यानंतर ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करणार असल्याचे भामट्याने सांगितले, त्याने जाधव यांच्या मोबाइलवर आधार  (Aadharcard) पॅनकार्ड (Pan Card) टाकले. त्यानंतर एक क्यूआर कोड (QR Code) पाठवून तो जाधव यांना स्कॅन (Scan) करायला लावला. त्यानंतर जाधव यांच्या खात्यातून ६ हजार रुपये वळते झाले. त्यावर जाधव यांनी फोन करून माझ्याच खात्यातून पैसे कट झाल्याचा निरोप दिला. त्यानंतर भामट्याने माफी मागून चारवेळा नवीन क्यूआर कोड पाठवून ७१ हजार रुपये वळते केले. फसवणूक होत असल्याचे कळताच जाधव यांनी पुढे व्यवहार थांबवला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️