एरंडोलनजिक झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी


एरंडोल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबायला तयार नाही. एरंडोल शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळकोठा येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच जण ठार झाले असून एक जण जखमी असल्याचे सांगण्यात आले. भरधाव कारने उभ्या ट्रकवर धडकून हा अपघात बुधवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान घडला.[ads id="ads1"] 

अपघातात चौघे जागीच ठार

या अपघातात विजयसिंग हरी परदेशी (रा.जांभळी, ता.चाळीसगाव), चतरसिंग परमसिंग परदेशी (38, रा.जांभळी), तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी (35, ह.मु.जळगाव), आबा रामचंद्र पाटील (58, रा.वडजी, ता.भडगाव) हे जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे.[ads id="ads2"] 

मित्राला सोडण्यासाठी जाताना झाला अपघात

जांभळी (ता.चाळीसगाव) येथून परदेशी परीवारातील सदस्य भडगाव येथे विवाहासाठी महिंद्रा एक्स.यु.व्ही.( क्रमांक एम.एच.19 सी.झेड 7360) ने आले होते. विवाह समारंभ आटोपल्यानंतर सर्वजण कारने एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी यांना भेटण्यासाठी एरंडोल येथे आले. तुषार परदेशी हे रिंगणगाव येथे गेलेले असल्यामुळे त्यांना घेण्यासाठी ते रिंगणगाव येथे गेले आणि त्यास जळगाव येथे घरी सोडण्यासाठी जात असताना पिंपळकोठा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक एम.एच.18 ए.ए.8857( ला मागील बाजूने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला.


प्रवासी उतरण्यासाठी थांबला होता ट्रक

अपघातग्रस्त ट्रक पिंपळकोठा येथे प्रवाशांना उतरविण्यासाठी थांबला व ट्रकमधून प्रवासी उतरत असतानाच महिंद्रा कार मागील बाजूने धडकली. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, हवालदार अनिल पाटील, पंकज पाटील, महेंद्र पाटील, मिलिंद कुमावत, अकिल मुजावर, विकास खैरनार, महेंद्र चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️