तसेच अनेक कामांची टेंडर ठराविक ठेकेदारांना मिळत असून प्रत्यक्षात काम करणारे ठेकेदार हे मात्र वेगळेच असतात बांधकाम सुरू असताना संबंधित विभागाचा निरीक्षण अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने अत्यंत निकृष्ट प्रतीची कामे होत आहेत याकडे संबंधित विभागाचे म्हणजे यावल पंचायत समिती, जिल्हा परिषद जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग यावल व जळगाव,नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्यासह खासदार, आमदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खुद्द ठेकेदारकडून लावला जात आहे.[ads id="ads2"]
यावल तालुक्यात खासदार व आमदार निधीतून तसेच इतर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेती अंतर्गत रस्ते, इतर विविध रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण,दुरुस्ती,डागडुजी, गटारी,गटारी वरील,ढापे,स्लॅप, शाळा खोल्या,घरकुले काही शासकीय इमारती,नालाबांध, खुल्या जागांवर बगीच्याची बांधकामे,समाज मंदिर,वृक्ष लागवड,वन विभागातील विविध विकास कामे होत आहेत ही कोट्यावधी रुपयाची विकास कामे होत असताना काही लोक प्रतिनिधीचे समर्थक ठेकेदारांनाच ते सुद्धा ई टेंडरिंगच्या माध्यमातून कामाचे ठेके मिळत असतात, कामाचे ठेके किती टक्केवारी नुसार? कसे? कोणाला?आणि कोणाच्या माध्यमातून ?आणि कोणाच्या प्रभावामुळे मिळतात? आणि काम करणारे ठेकेदार प्रत्यक्ष कोण असतात,काही ठेकेदार तर आपली कुवत नसताना इतरांच्या माध्यमातून आर्थिक पुरवठा करून आपल्या समर्थकांचे वाढदिवस साजरे करताना आणि जाहीर प्रसिद्धी करताना दिसून येत आहेत त्यामुळे यांच्याजवळ मोठमोठ्या रकमा येतात कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच या काही बोगस सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी संबंधित विभागाचा निरीक्षण अधिकारी उपस्थित राहतो का? काम उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे झाल्याचे प्रमाणपत्र कोणाकडून कसे मिळविले जाते इत्यादी सर्व माहिती संबंधित सर्व यंत्रणेला माहिती असल्याचे बोलले जात असले तरी याकडे मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि काही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसह लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल तालुक्यात(रावेर -फैजपूर)पूर्व आणि पश्चिम( किनगाव दहीगाव सौखेडा साकळी यावल) या भागातून होत आहे.
हेही वाचा :- किनगाव येथील तरूणाशी लग्न करून पैसे घेवून पसार झालेल्या नववधूला पोलीसांनी केली अटक
नायगाव,किनगाव,दहीगाव सौखेडा परिसरासह तालुक्यात होणाऱ्या नालाबांध व विविध रस्त्याच्या बांधकामाबाबत ठेकेदारांच्या स्पर्धेमुळे निकृष्ट कामांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी राजकीय प्रभावाला न जुमानता निकृष्ट कामाची चौकशी केल्यास फार मोठे रॅकेट उघडकीस आल्या शिवाय राहणार नाही असे सुद्धा आता यावल तालुक्यात बोलले जात आहे.