जळगाव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बैठकीतील १३ प्रस्तावांना मान्यता

 


जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत २२ प्रस्तावापैकी १३ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाकडे सादर झालेल्या प्रस्ताव मान्यतेसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी बैठक घेण्यात येत होती.[ads id="ads1"] 

परंतु, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी बैठक न घेता शेतकरी आत्महत्या समितीकडे प्रस्ताव जसजसे सादर होतील त्याप्रमाणे वेळोवेळी बैठक घेण्यात येऊन योग्य प्रस्तावांना मान्यता देण्यात येते. [ads id="ads2"] 

  जळगाव जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २२ प्रस्ताव सादर झाले. त्यापैकी मोतीलाल पोपट पाटील सांगवी, भास्कर गंभीर सरदार, शिवरे दिगर, रामलाल बळीराम पाटील, सावखेडे खु, दिलीप ओंकार मराठे, देवगाव, राजू काळू हटकर वाघरे ता. पारोळा, रवींद्र जगदेव मुंडे कुऱ्हा ता.मुक्ताईनगर, अनिल गोविंदा पाटील. बिल्दी, समसोद्दीन रज्जाक पिंजारी खेडगाव नंदीचे ता.पाचोरा, समाधान रतन पाटील कासारखेडा ता.यावल, विष्णू काळू काळे विचवे, कडून रामभाऊ पाटील कुऱ्हा हरदो ता.बोदवड, संजय भगवान राजपूत शहापूर ता. जामनेर अशा १३ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तर ५ प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांसह विविध कारणामुळे फेटाळण्यात आले, तसेच ४ प्रस्ताव फेरचौकशीसाठी तालुकास्तरावर पाठवण्यात आले.

हेही वाचा :- गॅसगिझर गळतीने महिला वैमानिकेचा मृत्यू; नाशिकमधील पंधरा दिवसातील दुसरी घटना 

हेहे वाचा :- शेतातील झाडाला गळफास घेऊन 23 वर्षीय युवकाची आत्महत्या 

हेहे वाचा :- स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री : मुक्ताईनगर तालुक्यातील दुकानदाराविरोधात गुन्हा

हेही वाचा :- किनगाव येथील तरूणाशी लग्न करून पैसे घेवून पसार झालेल्या नववधूला पोलीसांनी केली अटक 


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️