ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी व संध्याकाळी ओ पि डी अखेर सुरू .... ग्रामपंचायत ऐनपुर सरपंच अमोल महाजन यांच्या प्रयत्नामुळे यश



 ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) ऐनपुर ता.रावेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.२८/०२/२०२२ पासून सकाळी व संध्याकाळी ओ पि डी सुरू करण्यात येत आहे.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागात येत असून या आरोग्य केंद्राचे अंतर्गत २३ गावे लागू आहे या गावातील लोकांचा व्यवसाय हा शेती व मजुरी चा आहे त्या अनुषंगाने शेतकरी व मजुर वर्गातील लोक हे सकाळी मोलमजुरी करण्यासाठी जातात या लोकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात दि.२४/०२/२०२२ रोजी मासिक बैठकीत सर्व ग्रा.प.सदस्याच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी व संध्याकाळी ओ पि डी सुरू करण्यात यावी.[ads id="ads2"] 

   या विषयावर ठराव संमत करण्यात आला या आशयाचे पत्र ऐनपुर ग्रामपंचायत चे सरपंच अमोल महाजन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निरज पाटील यांना दिले या पत्राची दखल घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही.डी.महाजन यांनी शासनाच्या नियमानुसार सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळेत नियमितपणे ओ पि डी सुरू ठेवून रुग्ण सेवा देवून सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही म्हणून सकाळी ९ते१२व संध्याकाळी ४ते६ या वेळेत ओ पि डी सुरू करण्याचे आदेश ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निरज पाटील व डॉ संदिप चवरे यांना दिले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळ व संध्याकाळ ओ पि डी सुरू होणार म्हणून ऐनपुर परीसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️