शिस्तभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पं.स.तील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक निलंबित

 


मुक्ताईनगर प्रतिनिधी (समाधान गाढे) प्रशासकीय कामकाजात गैरवर्तन, अनियमितता आणि सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदभार असतांना परस्पर आदेश पारित करून शिस्तभंग केल्याप्रकरणी येथील पंचायत समिती (Panchayat Samiti) ग्राम पंचायत विभागाचे(Gram Panchayat Department) विस्तार अधिकारी राजकुमार जैन यांना तसेच कुन्हा येथील ग्रामसेवक विनायक पाटील या दोघांना निलंबित केले आहे.[ads id="ads1"] 

कामकाजात अनियमितता व हलगर्जीचा ठपका

  मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (Muktainagar Panchayat Samiti BDO) एस. आर. नागटीळक यांनी सोमवारी दुपारी निलंबनाचे आदेश काढले आहे. निलंबन काळात राजकुमार जैन यांचे मुख्यालयात पंचायत समिती मुक्ताईनगर (Panchayat Samiti Muktainagar) येथेच रहाण्याचे आदेश देण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

राजकुमार जैन हे येथील पंचायत समितीत विस्तार अधिकारी (ग्रा.प.) यापदावर कार्यरत असतांना प्रशासकीय कामकाजात गैरवर्तवणुक, कामकाजात अनियमितता तसेच कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा केल्यामुळे प्रशासकीय कामकाजास अडचण निर्माण केली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा पदभार असतांना त्यांनी परस्पर आदेश पारित करून सेवा शर्तीचे उल्लंघन केले. तसेच पं.स. अंतर्गत विविध योजनांवर नियंत्रण अधिकारी म्हणून आपली जवाबदारी योग्यपणे पार पाडली नाही असा ठपका त्यांच्या निलंबन आदेशात ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :- बामणोद येथील खळ्याला आग : दोन गुरांचा मृत्यू, सात लाखांचे नुकसान 

हेही वाचा:- चिनावल शिवारात केळीचे घळ कापून फेकनाऱ्या भामट्या विरोधात सावदा पोलीसात तक्रार दाखल

हेही वाचा :- तापी नदीपात्रात आढळला २३ वर्षीय युवकाचा मृतदेह ; रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद 

  तत्पुर्वी जैन यांची  चौकशी झाली. त्यात विविध नोंदी घेण्यात येऊन अहवाल जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. चौकशी अहवालावरून जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.) दिगंबर लोखंडे यांनी हे आदेश पारित केले. हे आदेश येथे प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. सोमवारी ३१ रोजी गटविकास अधिकारी (BDO) नागटीळक यांनी जैन यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या निलंबन कारवाई मुळे खळबळ उडाली आहे. वडोदा ग्रामपंचायतीच्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याने कोरोना बाधित सुटीवर असतांना ई टेंडर काढल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई ची टांगती तलवार असल्याची चर्चा असतांना आज ग्रा.प. विस्तार अधिकारी यांची विकेट पडली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️