रावेर येथे कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत ४२ लाभार्थींना धनादेशाचे वाटप

रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) रावेर तहसिल कार्यालय अंतर्गत कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील ४२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरण रावेर तहसिल कार्यालय (Raver Tahsil Office) सभागृहात दिनांक ३१ रोजी आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhari) यांच्या अध्यक्षतेखाली तर तहसिलदार उशारणी देवगुणे,नायब तहसिलदार संजय तायडे व नगरपालिका मुख्यधिकारी सालेहा समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले.[ads id="ads1"] 

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत ४२ लाभार्थींना धनादेशाचे Raver तहसिल कार्यालय सभागृहात ३१ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले. दारिद्रय रेषेखालील वयाच्या १८ ते ६० वर्षे आतील कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यु झाल्यास अशा कुटुंब प्रमुखाच्या विधवा पत्नीस २० हजाराचा लाभ देण्यात येतो.[ads id="ads2"] 

या आर्थिक वर्षात ४२ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार शिरीष चौधरी  (MLA Shirish Chaudhari) यांच्यासह तहसीलदार उशाराणी देवगुणे,नायब तहसिलदार संजय तायडे, नगराध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहम्मद मुख्यधिकारी सालेहा समीर शेख, कॉग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उपाध्यक्ष विनायक महाजन, युवक तालुका अध्यक्ष योगेश पाटील, महेंद्र पवार,राजू सवरणे, सावन मेढे,धुमा तायडे महेश लोखंडे, प्रताप पवार, ऊपस्थित होते. कुटुंबातील कर्त्या पुरुषावर त्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असते. परंतु नियतीच्या आड एखादी अनुचित घटना घडून अशा कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास, शासन अर्थसहाय्य योजनेंतर्गत मदत करते.

अर्थसहाय्य योजनेंतर्गत तालुक्यातील एकूण ४२ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश आमदार शिरीष चौधरी  (MLA Shirish Chaudhari) यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील संबंधित लाभार्थ्यांसह नागरिक उपस्थीत होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️