तळोदा (जि.नंदुरबार) : आदिवासी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी पाच लाच स्वीकारणार्या तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील क्लार्क किशोर पावरा यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपीने कार्यालयाबाहेर येवून लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.[ads id="ads2"]
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा एसीबीचे नाशिक अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, (वाचक), पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ, हवालदार उत्तम महाजन, हवालदार संजय गुमाने, नाईक अमोल ठाकरे, हवालदार विजय ठाकरे, नाईक दीपक चित्ते, नाईक देवराम गावीत, नाईक ज्योती पाटील व चालक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.