तापी नदीपात्रात आढळला २३ वर्षीय युवकाचा मृतदेह ; रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद


 

रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे)  : रावेर (Raver) तालूक्यातील बोहर्डे(Boharde) शिवारातील एका शेतालगतच्या तापी नदीपात्रातील (Tapi River)  हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) बॅकवॉटरमध्ये बेलसवाडी (Belaswadi)  (ता. मुक्ताईनगर) येथील २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रावेर पोलीसात (Raver Police)  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

  रावेर पोलीस (Raver Police) सूत्रांनी दिलेली माहिती अशी, बोहर्डे (Boharde)  शिवारातील रामा शिवराम कोळी रा. विटवे (Vitave)  ता. रावेर यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या तापी नदीपात्रातील (Tapi River)  हतनूर धरणाच्या (Hatnur Dam)  बॅकवॉटरवर बेलसवाडी (Belaswadi) ता. मुक्ताईनगर येथील दीपक ज्ञानेश्वर सुर्यवंशी ( २३) याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. [ads id="ads2"] 

  त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस पाटील (Police Patil) दिनकर रमेश वानखेडे रा. बोहर्डे (Boharde) यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलीसात (Raver Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :- बामणोद येथील खळ्याला आग : दोन गुरांचा मृत्यू, सात लाखांचे नुकसान 

हेही वाचा:- चिनावल शिवारात केळीचे घळ कापून फेकनाऱ्या भामट्या विरोधात सावदा पोलीसात तक्रार दाखल

हेही वाचा :- शिस्तभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पं.स.तील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक निलंबित

रावेरला ग्रामीण रुग्णालयात(Rural Hospital) केले शवविच्छेदन 

  रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. यावेळी मयत दीपक सुर्यवंशी याच्या नातेवाईकांना माहिती कळविल्याने तेदेखील रावेर ग्रामीण (Raver Rural Hospital) रुग्णालयात दाखल झाले होते शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (Raver PI)  कैलास नागरे (Kailas Nagare)  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️