पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून ACB चे पोलीस निरीक्षक (PI) बेपत्ता ; पोलीस दलात प्रचंड खळबळ

  जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau (ACB) Jalna) पोलीस निरीक्षक संग्राम ताटे Police Inspector Sangram Tate (रा.यशवंत नगर, जालना) हे बुधवारी (दि.2) रात्रीपासून बेपत्ता (Police Inspector Missing) झाले आहेत. मित्राला भेटण्यास जात असल्याचे सांगून ते रात्री घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे ताटे यांनी घराबाहेर पडताना मोबाईल, गाडी असे काहीही नेले नाही. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संग्राम ताटे यांचा शोध घेतला जात आहे.[ads id="ads1"]

जालना येथील लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बुधवारी रात्री सातच्या सुमारास राहत्या घरातून मित्राला भेटण्यासाठी (Meet Friend) जात असल्याचे पत्नीला सांगून घराबाहेर पडले. बाहेर जाताना त्यांनी गाडी, मोबाईल फोन, खिशातील वॉच पाकीट सोबत नेले नाही. याची माहिती मिळताच औरंगाबाद एसीबी (Aurangabad ACB) विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे (SP Rahul Khade) हे जालना शहरात ठाण मांडून होते. (Police Inspector Missing)[ads id="ads2"]

एसीबी कर्मचाऱ्यांकडून ताटे यांचा शोध सुरु आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि शहरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. 

हेही वाचा:Jalgaon : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी 

हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या 

हेही वाचा :- दुर्दैवी : सेप्टिक टॅँकमध्ये पडून दीडवर्षीय बालकाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना 

हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या 

ताटे यांच्याशी दोन दिवसांपासून संपर्क न झाल्याने त्यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात (Kadim Jalna Police Station) गुरुवारी उशिरा रात्री मिसिंगची तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यांची कोकण विभागात (Konkan Division) पदोन्नतीवर (Promotion) बदली (Transfer) झाली होती.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️