रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत 30 लाखाच्या अपहाराची तक्रार

बक्षीपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत 30 लाखाच्या अपहाराची तक्रार

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील बक्षीपूर (Bakshipur) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या खत विभागात सुमारे ३० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला, अशी तक्रार करण्यात आली आहे. याची जळगाव जिल्हा उप निबंधक संतोष बिडवई यांनी दखल घेत २१ डिसेंबरला रावेरच्या सहायक निबंधकांना चौकशीचे आदेश दिले. मात्र, महिनाभरापासून बिडवई यांनी पत्र देऊनही स्थानिक पातळीवर कोणतीही दखल घेतलेली नाही.[ads id="ads1"] 

रावेर तालुक्यातील बक्षीपूर (Bakshipur) येथील विविध कार्यकारी सोसायटीत आजी-माजी चेअरमन व व्हॉइस चेअरमन तसेच सचिवाने संगनमत करून संस्थेच्या खत विभागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला. ही रक्कम सुमारे २५ ते ३० लाखांपर्यंत आहे, असे जिल्हा उप निबंधक बिडवई यांच्याकडे झालेल्या तक्रारीत म्हटले आहे.[ads id="ads2"] 

   त्यानुसार २१ डिसेंबरला बिडवई यांनी रावेरच्या(Raver) सहाय्यक निबंधकांना चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. हे आदेश रावेरात २९ डिसेंबरला प्राप्त झाले. 

हेही वाचा: - Jalgaon : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी 

त्यास आता एक महिन्याचा काळ लोटला. मात्र, सहाय्यक निबंधकांनी अजूनही कार्यवाही केलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे सुरू आहे, असा आरोप संस्थेच्या सदस्यांनी केला आहे..

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️