Jalgaon : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : आज नव्याने १७९ रूग्ण आढळले


 जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून जळगाव शहरासह भुसावळ व चाळीसगाव तालुक्यात कोरोना रूग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. 
[ads id="ads1"] 

  जिल्ह्यात आज दविसभरात १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे.[ads id="ads2"] 

  जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण १७९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात -६४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-७३, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-२, धरणगाव-१, जामनेर-५, रावेर-२, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर -२, बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 Jalgaon जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५७८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४७३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून १६ उपचार घेवून घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️