जामनेर पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपीकाला ३ हजाराची लाच घेतांना अटक

 


जामनेर प्रतिनिधी : शेड बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी तीन हजाराची लाच घेतांना पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला अटक केली आहे.[ads id="ads1"] 

तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर झालेले असून गोठ्याचे शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी (वय-५३) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याने तीन हजार रूपयोची मागणी ११ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. [ads id="ads2"] 

  त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी सापळा रचुन लोकसेवक कनिष्ठ लिपीत वसंत बारी याला पंचायत समिती कार्यालयात तीन हजार रूपयांची लाच घेतांना अटक केली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️