आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आमदार चढले चक्क झाडावर

बीड  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज २६ जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बीड नगर परिषदेच्या (Beed Nagar Parishad) कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office)  समोर उपोषणाला बसल्या होत्या. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषदेत कंत्राटी कामगार असलेल्या दोन महिला झाडावर चढल्या.[ads id="ads2"]  

   आपल्याला न्याय मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्या सांगत होत्या. प्रजासत्ताक दिनाचे महत्व आणि महिला कामगारांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून अखेर आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandip Shirsagar) यांनी थेट झाडावर चढून आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढली. लवकरच तुम्हाला न्याय मिळवून देईन, असे आश्वासन दिल्यानंतर सदर महिला झाडावरून खाली उतरल्या आणि पुढील अनर्थ टळला. या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandip Shirsagar ) यांनी स्वतःच फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली.


आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नगर परिषदेच्या कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या...

Posted by Sandeep Kshirsagar on Tuesday, January 25, 2022

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️