Big Breaking : ट्रक-एस.टी. बस भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू

 अंबाजोगाई : बस व ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार, दिनांक 9 रोजी सकाळी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई-लातूर रोडवर बर्दापूरजवळ नंदगोपाल डेअरीसमोर घडला. [ads id="ads2"]  

  लातूर - औरंगाबाद बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून अपघातात सहा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️