अखेर त्या बँक व्यवस्थापकाला अटक


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  रावेर तालुक्यातील युवतीच्या फसवणूकप्रकरणी पाच महिन्यांपासून अंतरीम जामिनावर असलेल्या सेंट्रल बँकेच्या (Central) तत्कालीन व्यवस्थापकाला (Manager) हायकोर्टाने जामीन फेटाळल्याने कोविडच्या गृहविलगीकरणानंतर पोलिसांनी अटक केली.[ads id="ads1"] 

सरकारी नोकरी (Government Job) लावून देण्याचे व लग्न करण्याचे आमिष दाखवून Raver तालुक्यातील २३ वर्षीय युवतीची फसवणूक करून लैंगिक अत्याचार प्रकरणी खानापूर (Khanapur)  येथील सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या (Central Bank Of India) तत्कालीन शाखा व्यवस्थापक (Branch Manager)  नितीन यशवंत शेंडे (वय ३४) याच्याविरुद्ध रावेर पोलीसात  (Raver Police Station) बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. [ads id="ads2"] 

  या गुन्ह्यात तब्बल पाच महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court)  औरंगाबाद (Aurangabad Bench) खंडपीठाने दिलेल्या अंतरिम जामीनावर असलेल्या आरोपीला १३ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. अटकेसाठी स्वतः समर्पित झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. मात्र, गृहविलगीकरणानंतर २७ जानेवारी रोजी रावेर पोलिसांनी (Raver Police)  जबाबावरून त्यास अटक केली. रावेर न्यायालयाने (Raver Court)  ३१ जानेवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody)  सुनावली आहे.

हेही वाचा :- ब-हाणपूर - अंकलेश्वर महामार्ग देतोय अपघातास निमंत्रण 

हेही वाचा :- जळगावातील तरुणाच्या खूनाचा उलगडा : जामनेरातील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या 

हेही वाचा :- महाराष्ट्रात लवकरच "इतक्या" पदासाठी होणार पोलीस भरती ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा 

 तत्कालीन शाखा व्यवस्थापक (Branch Manager) नितीन यशवंत शेंडे रा. नागपूर याच्याविरुद्ध सरकारी नोकरी लावून देण्याचे व लग्न करण्याचे आमिष दाखवून तब्बल पावणेदोन वर्षे बँकेच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील २३ वर्षीय अविवाहित तरुणीवर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️