जळगाव येथील तरूणाचा संशयास्पद मृत्यू; घातपातची शक्यता

 जळगाव शहरातील(Jalgaon City) ममुराबाद नाका (Mamurabad Naka) नजीक ३५ वर्षीय तरूणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा.उस्मानियॉ पार्क(Usmaniya Park) असे मयत तरूणाचे नाव असून तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जळगाव(Jalgaon) तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील (Jalgaon City) उस्मानियॉ पार्क भागात शेख गफ्फार हे आईवडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. [ads id="ads2"] 

  बुधवारी २६ जानेवारी (26January) रोजी सायंकाळी काम आटोपून घरी निघाले होते. परंतू ते रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आले नाही. गुरूवारी २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममुराबाद(Mamurabad) रोडवरील कोंबडी फार्मजवळ(Porty Farm) त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला.

त्यांच्या डोक्यावर, हनुवटीवर मार लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. जळगाव तालुका पोलीस (Jalgaon Taluka Police) आणि नातेवाईकांनी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात(Jalgaon Civil Hospital) आणण्यात आला. यावेळी Jalgaon जिल्हा रूग्णालयात नातेवाईक व मित्र परिवार यांनी मोठी गर्दी केली होती. तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशयित नातेवाईकांकडून केले जात आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस(Jalgaon Taluka Police) ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.


जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️