रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) गेल्या सहा महिन्यापासून रावेर तालुक्यातील श्री राहुल रमेश लोखंडे, श्रीमती छाया रमेश लोखंडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी आणि श्री शामकुमार नाना पाटील इत्यादी ग्रामसेवक यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवून तालुका अंतर्गत बदलीचा लाभ पदरात पाडून घेतल्याचे प्रकरण गाजत आहे. [ads id="ads1"]
Raver पंचायत समितीकडून प्रत्येक आंदोलनावेळी नवीन शक्कल लढवून आंदोलनकर्त्यांना पत्र देण्याची औपचारिकता पार पाडली जाते; मात्र कारवाई करण्याची मागणी पुढे आली की, कागदी घोडे नाचवली जातात, त्याचा प्रत्यय आजच्याही आंदोलनावेळी आला.[ads id="ads2"]
या बाबत सविस्तर वृत्त असे की, या बनावट अपंग प्रमाणपत्र धारक ग्रामसेवक यांना गट विकास अधिकारी (Block Development Officer) यांनी धुळ्याच्या वैद्यकीय बोर्डाकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्या तपासणीत या पाचही ग्रामसेवक यांना कोणतेच अपंगत्व नसल्याचे व त्यांचे प्रमाणपत्रही बोगस असल्याचे स्पष्ट होऊन तीन महिने उलटले आहेत.
हा तपासणी अहवाल दिव्यांग संघटनेच्या हाती लागल्यानंतर पाठपुरावा करण्यात आला तर अपंग कल्याण आयुक्त, पुणे यांचेकडील दि २३/०५/२०१२ चे परिपत्रक आल्यावर कारवाई करू, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. परिपत्रक दिव्यांग संघटनेने उपलब्ध करून दिले तर आता गट विकास अधिकारी (BDO) म्हणतात, ग्रामसेवक यांना अपंगत्वचे प्रमाणपत्र जळगाव येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले आहे,त्यांच्याकडून खात्री करू द्या,नंतर कारवाई करू. अशी टोलवाटोलवी सुरू आहे.
दिव्यांगाबद्दल गळा काढणारे मात्र या वर बोलायला तयार नाही.इतर थातूर मातूर प्रकरणात एखादा पदाधिकारी म्हणतो म्हणून ग्रामसेवक यांचेवर तडकाफडकी कारवाई करणारे प्रशासन दिव्यांग संघटनेची मात्र चांगलीच दमछाक करतांना दिसत आहे.