सविस्तर माहिती अशी की, कैलास पालखे हे शनिवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात इलेक्ट्रीकचे किरकोळ काम करीत असतांना त्यांच्या हातालाच वायरचा स्पर्श झाल्याने वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यात ते जागीच ठार झाले आहे. तातडीने त्यांना नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात (Pachora Rural Hospital) दाखल केले असत वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके यांनी मयत घोषीत केले.[ads id="ads2"]
या घटनेबाबत पाचोरा पोलीस (Pachora Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे हे तपास करीत आहेत.
हेही वाचा :- ट्रक-एस.टी. बस भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू
मयतावर रविवारी दुपारी १२ वाजता निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार असून ते नाशिक येथील प्रमोद व सुधाकर कैलास पाखले यांचे वडील होत.