नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक अजय किका पाडवी आणि येथील चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे यांना एका शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले.[ads id="ads1"]
या घटनेचे मूळ तक्रारदार हे शेती व्यवसाय करीत असून तक्रारदार यांची नंदुरबार तालुक्यातील करणखेडा गाव शिवारात रस्त्यालगत गट नंबर २७ व ११२ याठिकाणी ३० एकर शेत जमीन असून सदर शेती तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे आहे. [ads id="ads2"]
सन २०२१ मध्ये दिवाळीदरम्यान निघालेली अंदाजे २०० किंटल ज्वारी त्यांच्या करणखेडा येथील गोडाउन मध्ये ठेवलेली असून सदर ज्वारी खराब असल्याचे सांगून तुझी ज्वारी तू विक्री होऊ शकत नाही असे सांगून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नंदुरबार येथील कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक अजय किका पाडवी आणि तेथील चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे यांनी सांगितले तुला जर ज्वारी विकायची असेल तर प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली.
शेवटी तडजोडीअंती प्रति क्विंटल ५० रुपये लागतील, अशी मागणी करण्यात आली. ७ जानेवारी रोजी नंदुरबार शहरालगत टोकर तलाव येथील धान्य गोदामात ५ हजाराची लाच स्वीकारली यावेळी सक्षम अधिकारी यांनी आरोपीला रंगेहात पकडले. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नंदुरबार येथील पथकातील पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस हवलदार उत्तम महाजन, विजय ठाकरे, विलास पाटील, पोलीस नाईक अमोल मराठे, दीपक चित्ते, महाले यांच्या पथकाने केली.