रावेर (समाधान गाढे) महाराष्ट्राच्या सीमेवर लागून असलेल्या बुन्हानपूर मध्ये गुरुवारी सात नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. गेल्या पाच दिवसांत आतापर्यंत एकूण १९ बाधित आढळले आहेत. त्यापैकी १० बाधीत हे महाराष्ट्रातून परतले असल्याचे समोर आले आहे. [ads id="ads1"]
अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मध्यप्रदेशातील बुन्हाणपूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे.[ads id="ads2"]
सीमेवर महाराष्ट्रातील प्रवाशांची तपासणी, होम क्वारंटाईन अनिवार्य : प्रवीण सिंह
महाराष्ट्रातील शेजारील चार जिल्ह्यांतील प्रवाशांना होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. गुरुवारी सात बाधित आढळले आहेत. यापैकी तीन जणांना कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेला असून सुद्धाते बाधित आढळले आहेत बऱ्हाणपूर शहरातील शनवारा लोणी सीमेवर लोकांना तपासासाठी थांबवले जात आहे.
जिल्हाधिकारी प्रवीण सिंह यांनी मास्कशिवाय जिल्ह्यातील प्रवासावर कडक कारवाई केली, जळगाव, येथे मास्कशिवाय थुंकल्यास एक हजार रुपये दंड होणार असून, आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्कशिवाय फिरणाऱ्यांना १०० रुपये दंड करण्याचे आदेश दिले आहेत. कोविड १९ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होम आयसोलेशन आणि करंटाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी शहर व ग्रामीण भागातील सक्षम अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सीमेवर पथके सज्ज
महाराष्ट्रातून दररोज २० हजार प्रवाशांची होणारी वाहतूक महाराष्ट्रातून बुरहानपूरमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. दोन्ही राज्यांतून दररोज २० हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. आरोग्य विभागाचे पथक सीमेवर सज्ज आहे. पोलीस नसल्याची समस्या आहे. महाराष्ट्रातून आल्यानंतर चौथ्या दिवशी चाचणी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी प्रवीण सिंह यांनी जारी केला आहे. यासाठी महापालिका आयुक्त एस. के. सिंग यांची नोडल ऑफिसर आणि प्रवीण भार्गव यांची सहाय्यक नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.