युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद प्रतिनिधी (प्रमोद धुळे) 73 वा प्रजासत्ताक दिन आज युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र रांजणगाव शे.पु औरंगाबाद येथे साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजकुमार कांबळे सर एरिया मॅनेजर युवा परिवर्तन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्याचे फायदे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यावर भाष्य केले.[ads id="ads1"] 
  ऍड.आनंद सूर्यवंशी सर यांनी सुद्धा विद्यार्त्यांना मार्गदर्शन करतांना भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी संविधान लिहल्यामुळे आज प्रत्येक समजातील लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहत आहेत ही सर्वात मोठी देणं संविधानाची आहे. [ads id="ads2"] 
  त्यानंतर प्रमोद धुळे सर यांनी प्रास्ताविक साजर करतांना भारतीय संविधान हे फक्त एका ठराविक घटकासाठी नसून ते देशातील समस्त मानवजाती साठी आहे.संविधामनामुळे आज प्रत्येकाला शिक्षणाची बोलण्याची वावरण्याची संधी संविधाना मुळे मिळाली संविधान प्रत्येकाला तोंडपाठ असणे आणि त्यांची प्रत्येकाने आपल्या जीवनात अंमलबजावणी करणे गरजेचे आहे आणि संविधानाचे रक्षण करणे गरजेचे आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मोहन गाडेकर सर,बगाटे बाबा,वसंतराव धुळे बाबा,कौशल्याबई गोवंदे आई,वंदना तुळसे आई,धुळे आई,राजू भालेराव सर,सुभाष गोरे साहेब,कांता रनवरे मॅडमे इत्यादी उपस्थित होते.सूत्रसंचालन ज्योती दिवसे मॅडम यांनी केले तर आभार राष्ट्रपाल मगरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी प्रकाश कांबळे सर,अविनाश कांबळे सर आकाश गुडड सर,आकाश राऊत सर,कान्हा गोरे सर,श्रावणी पठारे मॅडम,ज्योती शिंदे मॅडम,कोमल शिंदे मॅडम,पल्लवी राठोड यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️