औरंगाबाद (प्रतिनिधी ) आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र निळे प्रतीकचे संपादक रतनकुमार साळवे यांना भारतीय दलित पँथरच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. ज्या चळवळीला वृत्तपत्र नाही त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे असते असे वृत्तपत्राचे महत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पटवून दिले आहे. [ads id="ads1"]
वृत्तपत्र हा समाजाचा आरसा असतो.निळे प्रतिक हे आंबेडकरी विचारांचे वृत्तपत्र जागल्याची भूमिका निभावत आहे. चळवळीचे वृत्तपत्र ही टिकली पाहिजे,जगली पाहिजे त्यासाठी समाजाने त्यांना मदत देखिल केली पाहिजे असे प्रतिपादन भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष लक्ष्मणदादा भूतकर यांनी केले. ते निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते.[ads id="ads2"]
चळवळीमध्ये इमानेइतबारे काम करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार व्हायला पाहिजे. सत्कारामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि ते अधिक जोमाने कार्य करतील. म्हणून आज दर्पण दिनानिमित्त रतनकुमार साळवे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं आहे असे ते म्हणाले. यावेळी लक्ष्मण दादा भुतकर (महाराष्ट्र अध्यक्ष,भारतीय दलित पॅंथर ),रशपालसिंग अट्टल (संपादक,साप्ताहिक अट्टलमत ), गीताबाई म्हस्के (मराठवाडा महिला अध्यक्ष)प्रकाश पवार (मराठवाडा कार्य अध्यक्ष) अँड. सतीश राऊत (जिल्हा सचिव ) दशरथ कांबले (मराठवाडा उपाध्यक्ष ) यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम वृत्तपत्र निळे प्रतीकच्या कार्यालयात संपन्न झाला.