बामणोद येथील खळ्याला आग : दोन गुरांचा मृत्यू, सात लाखांचे नुकसान


 यावल : तालुक्यातील बामणोद (Bamnod) सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पंकज हिरामण भंगाळे यांच्या खळ्याला आग लागून सहा लाख 64 हजारांचे नुकसान झाले. आगीत दोन गुरांचा मृत्यू ओढवला शिवाय केसिंग पाईपासह (Pipes) शेती अवजारे, गुरांचा चारा आदी साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
[ads id="ads1"] 

शेतकऱ्यावर कोसळले संकट

घटनास्थळी सर्कल (Circle) बबिता चौधरी, प्रभारी तलाठी भारत वानखेडे यांनी पंचनामा केला. फैजपूर पोलिस (Faizpur Police)  ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या नेतृत्वातील कर्मचाऱ्यांन प्रत्यक्ष पाहणी करीत पंचनामा केला. [ads id="ads2"] 

  स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याकामी मेहतन घेतली. आग विझवण्यासाठी भुसावळ (Bhusawal) नगरपालिका, फैजपूर नगरपालिका Faizpur) व सावदा (Savada) नगरपालिका यांचे अग्निशामक चार बंब मागवण्यात आले. प्रमोद बोरोले, गोकुळ लोखंडे, कल्पेश महाजन, भीमा झोपे, पवन महाजन, जीवन बोरोले, अरविंद झोपे, तंटामुक्त अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी सहकार्य केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️