औरंगाबाद प्रतिनिधी : प्रमोद धुळे
युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वि जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.संजय संभाळकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सावित्रीमुळे आज मुली उच्चपदस्थ विराजमान होत आहेत पूर्वी बालविवाह,केशवपन या सर्व समश्यांचा सामना फक्त स्त्रीवर्गांनाचं करावा लागत होता पण आज परिस्थती बदलत आली आहे.[ads id="ads1"]
आणि महिलांना आपली आवड निवड करण्याची संधी माता सावित्री यांच्यामुळे मिळाली आहे.त्यानंतर श्रीकृष्ण वानखेडे सर युवा परिवर्तन अकॅडमी मुंबई यांनी महिलांच्या महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी सरकार मार्फत ग्रामपंचायत स्थरावर निधी मिळत असतो तो निधी त्यांच्या विकासात्मक कामावर खर्च करून त्यांना स्वावलंबी बनविने हे स्थानिक प्रशासनाचे काम आहे.युवा परिवर्तन हे पैसे कमविण्यासाठी येथे आले नसून विद्यार्थी घडविण्यासाठी व त्यांना रोजगार निर्माण करून देण्याससाठी आलेले आहे.[ads id="ads2"]
त्यानंतर भरत सिंग सलामपुरे सर यांनी मुले आणि मुली असा भेदभाव आई आणि वडिलांनी न करता सर्व सोयी सुविधा एकसमान आपल्या पाल्यानां देण्याचा प्रयत्न करावा व जास्तीत जास्त त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे.प्रा.डॉ.समाधान वाघमारे सर यांनी विद्येची दैवत ज्यांना आपण मान्य करतो त्याच प्रमाणे त्यांचे विचार आपण अंगिकारणे अपेक्षित आहे व सावित्रीबाई यांच्या प्रमाणे समाजात कष्टकरी,शोषित पीडित, वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणून शिक्षणाचे महत्व पटवून दिले पाहिजे.त्यानंतर पंचायत समिती सदश्य दीपक बडे यांनी महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे व आपल्यामधील कौशल्य ओळखून त्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाव देण्याचा प्रयत्न करावा.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रमोद धुळे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन तृप्ती उबाळे व अनुजा वाटोडे यांनी केले.अभार पल्लवी राठोड यांनी मानले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कान्हा गोरे,सर,ज्योती दिवसे मॅडम,कोमल शिंदे मॅडम,राजू भालेराव सर,विजय जटाळे सर,सागर बांडे, अंकिता भिसे, मुस्कान लाहोट,श्रद्धा निकम,अपर्णा चोखटे, अश्विनी शरणागत, ज्योती चिभडे,प्रतिमा बेले,खरात,ओमकार ताठे,गोकुळ भगूरे,श्रावणी पठारे मॅडम,सुनील हिवाळे, ऍड.दया वाहुळ, सतीश खैरे,कांता रनवरे मॅडम यांनी परिश्रम घेतले.