कनाशी आश्रमशाळेत नवउपक्रम अलेक्झा चे कळवण प्रकल्प अधिकारी मा. विकास मीना यांच्या हस्ते केले उद्घाटन

 

कळवण प्रतिनिधीसुशिल कुवर : कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कनाशी येथे बुधवार दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी कोविड-१९ चे सर्व नियम पाळून माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (कळवण) माननीय विकास मीना साहेब यांच्या हस्ते अलेक्झा उद्घाटन करण्यात आले. [ads id="ads1"] 

  देशात तंत्रज्ञान अधिग्रहण आणि जागतिकीकरण शिक्षण व्यवस्था खूप वेगाने बदलत आहे. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ तंत्रज्ञानावर आधारित आणि ऑनलाइन शिक्षणाचा आहे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अलेक्झां हा नवोउपक्रम कनाशी आश्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे. [ads id="ads2"] 

  डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांच्या फायद्याची असून शिक्षणाचा वेग वाढणार आहे. त्याच बरोबर माननीय मीना साहेबांनी सर्व टीमचे कौतुक केले. तसेच हा उपक्रम इतर शाळांसाठी दिशादर्शक असेल असे ही त्यांनी सांगितले. विद्यार्थिनी अलेक्झा ला काही प्रश्न विचारून डेमो सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रम शाळेचे माननीय मुख्याध्यापक ए. एच. सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन एन. जी. देवरे सरांनी केले. तर आभार प्रदर्शन अजय गुप्ता यांनी मानले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षक डी. पी. पवार, जे. व्ही. गावित, टी. ए. चव्हाण, जी. एन. भरसट, के. एस. रौंदल, सी. डी. सोनवणे, आर. आर. चौरे, सी. के. बागुल,  वाय. एल. पवार, रोशन सूर्यवंशी, टी. बी. पगार, ए. एस. बागुल, सोनोने सर, अष्टेकर मॅडम, धाबळे मॅडम, झनान मॅडम, चौरे सर व इतर कर्मचारी उपस्थितीत होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️