ओव्हरटेक करणे पडले महागात ; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू


 मध्य प्रदेश : धान भरलेला ट्रक अमरपाटणकडे जात होता. नदीजवळ ऑटो ट्रकला ओव्हरटेक करीत असताना पलटी झाल्याने चार जणांचा मृत्यू (Four people killed) झाला. ही घटना रविवारी (ता.१६) सतना येथे घडली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर ऑटो चालकही ठार झाला.
[ads id="ads1"] 

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या इटमा नदीच्या तीर गावाजवळ ट्रक खरेदी केलेला धान अमरपाटणकडे घेऊन जात होता. नदीजवळ ऑटोरिक्षा ट्रकला ओव्हरटेक करीत (terrible accident) असताना पलटी झाली. [ads id="ads2"] 

  ऑटोरिक्षात ज्ञानेंद्र मिश्रा, त्यांची आई, पत्नी आणि मुलगी बसली होती. ऑटो पलटल्याने चालक लखपतीसह ज्ञानेंद्र मिश्रा यांची आई बंतना देवी मिश्रा, पत्नी निर्मला मिश्रा आणि मुलगी रितू मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.

   मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chouhan) यांनी सतना जिल्ह्यातील अमरपाटण येथे झालेल्या रस्ता अपघातात चार नागरिकांच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी अपघातात जखमी झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️