समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जावून दोन तरुणींनी साखरपुडा उरकला आहे. या साखरपुड्याला त्यांनी कमिटमेंट एनिव्हर्सरी असं नाव दिलं आहे. सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी असं या धाडसी तरुणीचं नाव आहे.[ads id="ads1"]
या दोघी भविष्यात लग्न देखील करणार आहे व त्या लग्नाला नाव देणार आहे सिविल युनियन..! समलैंगिकतेला आपल्याकडे कायद्याने मान्यता नाही व समाजामध्ये ही याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातंय, पण असं असताना देखील नागपूरमध्ये दोन मुलींनी साखरपुडा केला आहे.[ads id="ads2"]
अलीकडे या दोघींचा नागपूरमध्ये एका रिसॉर्टवर साखरपुडा पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याला दोघींच्या घरच्या मंडळींना पाठिंबा दिला. येत्या वर्षभरातच दोघींचे लग्न होणार आहे. सुरभी मित्रा ही डॉक्टर आहे तर पारोमिता मुखर्जी ही एका खासगी कंपनीमध्ये मोठ्या हुद्यावर नोकरीला आहे. सुरुवातीला पारोमिता मुखर्जी हिच्या कुटुंबीयाकडून या संबंधाचा विरोध झाला होता. मात्र मुलीच्या प्रेमापोटी पारोमिताच्या वडिलांनी संबंध मान्य केला. सुरुवातीला पारोमिता मुखर्जी हिच्या कुटुंबीयाकडून या संबंधाचा विरोध झाला होता. मात्र मुलीच्या प्रेमापोटी पारोमिताच्या वडिलांनी संबंध मान्य केला.