जळगाव : जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस पसरत असून जळगाव जिल्हा प्रशासनाने आता धडक मोहिम राबवून मास्क न लावणाऱ्यांसह नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. [ads id="ads1"] जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल 80 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नागरीकांकडून कोरोना नियम धाब्यावर बसवले जात असल्याने प्रशासनाने धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.[ads id="ads2"]
दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
जळगाव जिल्हाभरात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 386 नागरीकांना कोरोनाची (Corona) लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सोमवारी एका रुग्णाने कोरोनावर (Corona) मात केली.
कोणत्या तालुक्यात आढळले नव्याने (Corona) बाधीत
जळगाव शहर 13 जळगाव ग्रामीण 04
भुसावळ 25
अमळनेर 02
चोपडा 25
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 01
एरंडोल 00
जामनेर 01
रावेर 04
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 04
बोदवड 00
अन्य जिल्हा 01