Bharat देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अधोरेखित करत या नृत्यसंरचनेची मध्यवर्ती कल्पना 'विविधतेतील एकता' अशी आहे. ती अन्वर्धक आहेच, पण नृत्यसंरचना सजवण्यासाठीही पूरक आहे. राज्यातील जैविविधता यात प्रजासत्ताक दिनाला राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ झळकणार आहे. यंदा आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) जैवविविधता ही यंदाच्या चित्ररथाची थीम आहे.
प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्याचा समावेश
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर होणारी ही नृत्यसंरचना एकूण १२ मिनिटांची आहे. त्यात कथ्थकसह भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, ओडिसी, मणिपुरी, कुचिपुडी अशा अन्य भारतीय नृत्यशैलींचाही समावेश आहे. शिवाय आपले लोकनृत्य आणि आदिवासी नृत्याचाही अंतर्भाव आहे.
सकाळी साडेदहाला सादर होईल नृत्य
दिल्ली (Delhi) येथे राजपथावर होणाऱ्या संचलनात ऐश्वर्या साने तिच्या ग्रुप बरोबर पथसंचलन करणार आहे. यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्य (Indian Classical Dance) कथ्थकचा समावेश २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात केला आहे. यावेळी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच देश विदेशातील मान्यवरांची उपस्थिती असेल. या संचलनातील सांस्कृतिक कार्यक्रम निवडीसाठी दोन चाचणी फेऱ्या मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या तिथे गुरु तेजस्विनी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी ऐश्वर्याच्या ग्रुपने कथ्थक नृत्य सादर केले व त्यांची निवड झाली. वंदे भारतीयम या कार्यक्रमांतर्गत साडेदहा ते साडेबारा या वेळेत त्यांचे नृत्य सादर होईल. यासाठी त्यांचा समूह ८ जानेवारीला दिल्ली येथे गेला. रोजचा सराव व शेवटचा आठवडा कडाक्याच्या थंडीत धुक्यात पावसात सराव करताना एक वेगळा अनुभव व देशाभिमान त्यांना जाणवला.
१७०० व्हिडिओमधून पहिल्या पाचमध्ये स्थान
यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहासात प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात शास्त्रीय नृत्याचा समावेश करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून गुरु तेजस्वीनी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली एश्वर्या साने यांच्या गृपचा व्हिडीओ पाठवला. देशभरातील १७०० व्हिडिओमधून वेगवेगळ्या चाचण्या पार करत हा व्हिडिओ पहिल्या पाच क्रमांकात आला.
कलाकारांची १५ दिवसांपासून मेहनत
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंतप्रधान आणि अन्य देशांच्या पाहुण्यांसमोर आपली अभिजात नृत्यसंरचना सादर करण्याचा मान मिळणे हे माझ्यासाठी एकाच वेळी अभिमानाचे, आनंदाचे आणि जबाबदारीचे काम आहे. गेले पंधरा दिवस सगळे कलाकार खूप मेहनत घेत असल्याचे एश्वर्या साने यांनी सांगितले. गुरू तेजस्विनी साठे यांनाही नृत्य दिग्दर्शन करण्याचा बहुमान मिळाला. कुमारी ऐश्वर्या ही शेंदुर्णीच्या प्रसिद्ध हदयरोग तज्ञ (कै.) डॉ. चारुदत्त साने व हेडगेवार शिक्षण संस्था अध्यक्षा डॉ. कौमुदी साने यांची सुपुत्री असून याप्रसंगी आजी मंगला साने, भाऊ डॉ. कल्पक साने, वहिनी ऋचा साने सर्व साने कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन केले. आपल्या कलेद्वारे तिने आपल्या गावाचे म्हणजे शेंदुर्णी गावचे तसेच राज्य, देशाचे नाव उंचावले अशी भावना समस्त शेंदुर्णी कर नागरिकांमध्ये असून सर्वांना तिचा अभिमान असून सर्वांनी शुभेच्छा पर अभिनंदन केले आहे.