अपघातात मयताच्या वारसांना तीन महिन्यात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयाकडून नुकसान भरपाई मंजूर

सांगली - 11 डिसेंबर 2021 रोजी सांगली जिल्हा न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालत झाले. लोक अदालत मध्ये अपघातात मयत वारसांना न्यायालयकडून तीन माहिने मध्ये नुकसान भरपायी मंजूर झाले. मालगाव येतील युराज सुतार हे डम्पर -मोटार सायकल अपघातात मयत झाले होते. त्यांच्या कायदेशीर वारसांना र.रु. 16,55,000/-. मंजूर झाले. 
[ads id="ads2"]
तसेच दिगंची,आटपाडी येथील शिवाजी शिंदे यांचा सांगोला येथे ट्रकटरने धडक दिल्याने गंभीर जखमी होवून मयत झाले होते. त्यांच्या कायदेशीर वारसांना, र. रु. 15,85,000/-मंजूर झाले आहे. तसेच करगणी, आटपाडी येथील अभिजित लोहार यांचा ट्रकटरने धडक दिल्याने गंभीर जखमी होवून मयत झाले होते. त्यांच्या कायदेशीर वारसांना, रु.16,61,000/- मंजूर झाले आहे. लोक अदालत मध्ये अपघातात मयत वारसांना सांगली जिल्हा न्यायालयचे प्रधान जिल्हा न्यायाधीश मा.श्री. आर. एस. राजंदेकर यांचे हस्ते मयतांच्या वारसांना चेक देण्यात आले. 
मयतांच्या वारसदारकडून अँड प्रशांत नारायण जाधव, अँड बसवराज होसगौडर यांनी काम पाहिले. तसेच इफको टोकियो जेनरल इन्शुरन्स कंपनीकडून अँड सचिन फाटक यांनी काम पाहिले. 

         या वेळी जिल्हा न्यायाधीश मा.श्री आर.के मलाबादे, मा.श्री. डी.पी. सातवळेकर, मा. श्री. एस.आर. भदलगे, मा. श्री आर. वि. जगताप, मा. श्री. एस.पी. पोळ, मा.श्री. एस.वि. पोतदार, मा. सौ. एम.एम. पाटील. तसेच पॅनल सदस्य अँड यु.वि. लोखंडे, अँड जे.वि.नवले, अँड सौ. एम. एम. दुबे, अँड फारूक कोतवाल. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मा. श्री. पी. के. नरडेले हे उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️