जामनेरजवळ भीषण अपघातात भुसावळातील दोन जणांचा जागीच मृत्यू

 


भुसावळ-जामनेर दरम्यान असलेल्या खावडी जत्रा ढाब्याजवळ भरधाव ट्रकने इंडिगो कारला समोरून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात भुसावळातील तुकाराम नगरातील दोघे जागीच ठार झाले तर तीन जण अत्यवस्थ आहेत. हा अपघात गुरुवार, 23 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडला.[ads id="ads1"] 

   या अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (30, रा. तुकाराम नगर, भुसावळ), सुजाता प्रवीण हिवरे (30, रा.भुसावळ) हे जागीच ठार झाले तर हर्षा पंकज सैंदाणे (25), नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा राजीव सैंदाणे हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर जळगावच्या डाबीसह ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.[ads id="ads2"] 

लग्नाला जाणार्‍या वर्‍हाडाच्या वाहनाला ट्रकची धडक

भुसावळातील सैंदाणे परीवारातील युवकाचे औरंगाबाद येथे शुक्रवार, 24 रोजी लग्न असल्याने वर्‍हाडी दोन वाहनाने जामनेरमार्गे औरंगाबादकडे निघाले होते तर नवरदेवाच्या भावासह अन्य वर्‍हाडी इंडिको (क्रमांक एम.एच.18 डब्ल्यू.2412) ने निघाले असता जामनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या खावडी जत्रा ढाब्याजवळ समोरून आलेल्या भरधाव अज्ञात ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

एक वर्षांचे बाळ सुखरूप

या अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (30, रा. तुकाराम नगर, भुसावळ), सुजाता प्रवीण हिवरे (30, रा.भुसावळ) हे जागीच ठार झाले तर हर्षा पंकज सैंदाणे (25), नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा राजीव सैंदाणे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल तसेच डाबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पंकज सैंदाणे व हर्षा सैंदाणे या दाम्पत्याचे एक वर्षीय बाळ स्पंदन पंकज सैंदाणे हे सुखरूप बचावले असून त्यास खरचटलेदेखील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अपघातानंतर पोलिस अधिकार्‍यांची धाव

अपघाताचे वृत्त कळताचे जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केल्यानंतर जखमींना उपचारार्थ हलवण्यात आले. अपघाताला कारणीभूत ठरणारा ट्रक धडकेनंतर पसार झाला असून पोलिसांकडून या ट्रकचा शोध सुरू करण्यात आला आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️