कराड - विशेष प्रतिनिधी (अॅड बसवराज होसगोंडर) आज रोजी बुधवार दि . 15/12/2021 रोजी कराड येथे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विविध रंग व्यवसायीक दुकाने 1 ) शिवानी पेंटस राजेंद्र विठठल सुपनेकर , रा . कराड 2 ) देवकर पेंटस शेख , रा वाघेरी 5 ) सहयाद्री पेंटस संदिप किसनराव देवकर , रा.कराड 3 ) सनशाईन पेंटस- तोहीम नजीर ता.कराड 4 )
[ads id="ads2"]
भारत पेंटस नवीद गुलामहुसेन वाईकर , रा . कराड आखतर सिराज वाईकर रा.कराड या दुकानांवर एकाच वेळी वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे धाड टाकून वन्यप्राणी मुंगुस सदृश्य केसापासून बनविलेले पेंटींग ब्रश मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले . वरील दुकानांतून जप्त करण्यात आलेले मुंगुस सदृश्य केसापासून बनविलेले
ब्रश पुढील प्रमाणे 1 ) शिवानी पेंटस 92 ब्रश 2 ) देवकर पेंटस 447 ब्रश 3 ) सनशाईन पेंटस 212 1735 पेंटींग ब्रश 4 ) भारत पेंटस 163 ब्रश 5 ) सहयाद्री पेंटस 821 ब्रश असे एकूण ब्रश जप्त करण्यात आलेले आहेत . वरील आरोपींवर वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 39,49 ब , 50,51 अन्वये गुन्हा नोंद केला आहे . मा श्री महादेव मोहिते , उपवनसंरक्षक वनविभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मा . श्री महेश झांजुर्णे सहाय्यक वनसंरक्षक ( वनी व कॅम्पा ) सातारा , श्री तुषार नवले , परिक्षेत्र वनअधिकारी कराड , श्री रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक , वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे कॉन्स्टेबल विजय नांदेश्वर व संदिप येवले वनविभाग कराड येथील वनपाल ए.पी.सवाखंडे , डी.डी.जाधव , बी . सी . कदम व वनरक्षक रमेश जाधवर , अरुण सोळंकी , सुनिता जाधव , उत्तम पांढरे , अश्विन पाटील , शंकर राठोड , सुभाष गुरव , सविता कुटटे , दिपाली अवघडे , पुजा परुले पुजा खंडागळे , शितल पाटील , संतोष यादव , अरविंद जाधव , कविता रासवे या सर्वांनी सदर कारवाई मध्ये भाग घेतला होता . सदर गुन्हयाचा पुढील तपास मा . श्री महादेव मोहिते , उपवनसंरक्षक वनविभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मा . श्री महेश झांजुर्णे सहाय्यक वनसंरक्षक ( वनी व कॅम्पा ) , सातारा व श्री तुषार नवले , परिक्षेत्र बनअधिकारी , कराड हे करीत आहेत . वन्यजीव गुन्हयासंबंधित माहिती वनविभागाचे टोल फ्री क्रमांक 1926 या हेल्पलाईनवर देणेचे आवाहन करण्यात येत आहे .