रावेर प्रतिनिधी : रावेर येथे जवळपास सात महिन्यापासून गाजत असलेल्या बनावट कागदपत्रे सादर करून ग्रामसेवक यांनी बदली व अन्य लाभ पदरात पाडून घेतल्या प्रकरणी मस्कावद बु येथील ग्रामसेवक शिवाजी सोनवणे सह गुन्हा दाखल होण्याची मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे.[ads id="ads2"]
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मस्कावद बु येथील ग्रामसेवक शिवाजी सोनवणे यांनी वाघोदा खु येथून बदली टाळण्यासाठी स्वतः ची एन्जोप्लास्टी झालेली असतांना ह्रदय शस्रक्रिया झाल्याचे भासविले आहे तर राहुल रमेश लोखंडे ( कोचर बु),छाया नेमाडे(मांगी),शामकुमार पाटील(सिंगत),रविंद्र कुमार चौधरी (पुरी गोलवाडे) आणि नितीन महाजन या पाच ग्रामसेवक यांनी वेळोवेळी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे, या सर्वां वर प्रशासकीय व फौजदारी स्वरूपाची कारवाईची बाविस्कर यांनी मागणी केली आहे आणि येत्या सात दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.