वाघांच्या हल्ल्यात पाल येथील दहा वर्षीय बालक गंभीर जखमी


रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) पाल येथे कंपार्टमेंट 61 मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीच्या  चिकुकल्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याने बालक गंभीर जखमी झाला आहे. ही सदर घटना दिनांक 1 डिसेंबर बुधवारी सकाळी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.[ads id="ads2"]  

पाल च्या पुढे असलेले मांजल येथील गुराखी दिपला बारेला हा त्याच्या मित्रासमवेत दररोज प्रमाणे शेतात शेळी व गुरे चारण्यासाठी  वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये गेले होता. 

हेही वाचा :- मस्कावद बु।।येथील ग्रामसेवक शिवाजी सोनवणेसह इतर पाच ग्रामसेवक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा : आनंद बाविस्कर यांची मागणी 

याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने, सर्वप्रथम आधी शेळीवर हल्ला चढवला व नंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर,तोंडावर,पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले. [ads id="ads1"]  

याबाबत सोबतच्या गुराख्यानी गावाकडे धाव घेत,गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेलल्या घटनेबाबत सांगितले, गांवकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून वाघ पसार झाला होता.यानंतर वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमीला दुचाकीवर तात्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याठिकाणी प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️