माहिती अधिकारात मागितलेली माहिती विहित मुदतीत न दिल्याने जन माहिती अधिकाऱ्यास ३ हजार रुपयांचा दंड

 


जळगाव प्रतिनिधी(समाधान गाढे) माहिती अधिकारात मागितलेली माहिती विहित मुदतीत न दिल्याने तसेच अपिलाच्या निर्णयानंतरही माहिती न दिल्याने व खुलासा सादर करण्याचे आदेश देऊनही खुलासा सादर न केल्याप्रकरणी एरंडोल नगरपालिकेचे जन माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक एच.आर. जोगी यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
[ads id="ads1"] 

एरंडोल नगरपालिकेचे जन माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक एच.आर.जोगी यांच्याविरोधात राजधर संतोष महाजन यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार एच.आर.जोगी यांनी दिलेली माहिती आबा महाजन यांनी दिलेल्या माहिती अर्जाला अनुसरुन विहित मुदतीत तसेच अपिलाच्या निर्णयानंतर ही माहिती पुरविली नसल्याने त्यांचे विरुद्ध माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (१) अन्वये शास्तीची कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा खुलासा जोगी यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.[ads id="ads2"] 

खुलासा सादर न केल्यास त्यांचे काहीही म्हणणे नसल्याचे गृहीत धरून शास्तीचे कायम केले जाऊ शकतील असे नमुद केले आहे. तसेच त्यांनी दिलेला खुलासा हा अमान्य करुन त्यांच्या विरुद्ध माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (१) अन्वये ३ हजार रुपये शास्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. ही रक्कम प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी एरंडोल यांनी जोगी यांच्या वेतनातून कपात करुन या रकमेचा भरणा माहितीचा अधिकार लेखाशिर्षा खाली जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️