शिवनेरी बस कुणाच्या मालकीच्या?प्रकाश आंबेडकरांचा एसटीतल्या भ्रष्टाचारावर प्रश्न

 


गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यानंतर काल एसटीच्या विलिनीकरणाबाबत सोमवारी २० डिसेंबर २०२१ रोजी त्रिसदस्यीय समिती अहवाल सादर करणार होती.[ads id="ads1"]

परंतु न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. पण विलिनीकरणाच्या मागणीवरुन कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी आंदोलन मागे घेण्याची शक्यता होती.[ads id="ads2"]

यानंतर आता प्रकरणावरील सुनावणी आता बुधवारी २२ डिसेंबरला दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे. यानंतर आता राज्यात एसटीतील भ्रष्टाचारावर चर्चा होताना दिसते आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'शिवनेरी' बस कुणाच्या मालकीच्या आहेत, 'व्होल्वो बस' कशा चालवल्या जातात, प्रति किलोमीटरचा दर किती आहे, हे सरकारने जाहीर करावे. फायदेशीर रुट कोणते आहेत, हे देखील एसटीने सांगावे असे म्हटले आहे.

हेही वाचा :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित 

तसेच पुढे बोलताना महाराष्ट्रात अनेक सर्वसामान्य प्रवासी एसटी वापरतात, तरी एसटी तोट्यात का? असा सवाल उपस्थित होतो. तसेच, एसटीच्या भ्रष्टाचारावर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना, संपावर असलेल एसटी कर्मचारीही बोलायला तयार नाहीत! अनेक वर्षांपासून एसटी शिवनेरीची सेवा देते आहे. तिचा नेमका फायदा किंवा तोटा एसटी महामंडळाला किती आहे, हे समजले पाहिजे. एसटीत कोणतेही व्यवस्थापन नसल्याने एसटी तोट्यात आहे, असे ते म्हणालेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️