Jalgaon : जिल्ह्यात 1500 किलोचा गांजा जप्त; मुंबई NCB ची मोठी कारवाई


जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे) :  मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर (Mumbai Cruise Drugs Case) काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मोठी कारवाई केली.[ads id="ads2"] 

यामुळे राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर, आता मुंबई एनसीबी (Mumbai NCB) पथकाकडून 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल याठिकाणी करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता.

याबाबत मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाला खब-याकडून माहिती मिळाली.

या माहितीनूसार ही कारवाई करण्यात आली आहे.

ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी दोघां जणांना अटक (Arrested) करुन त्यांच्याकडून तब्बल 1500 किलोचा गांजा हस्तगत केला आहे.

या दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून 24 किलो चरस आणून मुंबईला पुरवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी टोळीला अटक करुन त्यांच्याकडून 24 किलो चरस जप्त करण्यात आला होता. म्हणजेच 14 कोटी 40 हजाराचा माल जप्त करण्यात आला होता.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️