सावधान नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नंदुरबार -  दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाल्याने तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थितीमुळे येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता निर्माण झाल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे. 
[ads id="ads2"]
तसेच मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी अथवा ढग फुटी होऊन तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होऊ शकतो यामुळे तापी नदी तसेच उप नद्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावातील तसेच आसपासच्या गावांच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
[ads id="ads1"]
तसेच जिल्ह्यात 1 डिसेंबर व 2 डिसेंबर 2021 रोजी वादळीवारा (ताशी 30 ते 40 कि.मी ), विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता होणार असल्याने शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवुन ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही अशी काळजी घ्यावी. विजा, गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, वीज वाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, वादळी वारे पासुन संरक्षणासाठी भाजीपाला, मिरची, पपई,केळी इत्यादी पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी. पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणे ठेवावीत. पथारीवर वाहत ठेवलेली मिरची सुरक्षित ठिकाणी झाकुन ठेवावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️