बार्शी - शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांवर दहशत बसण्याच्या चुकीच्या उद्देशाने शासकीय कामात अडथळा केल्यास पाच वर्षाची सजा अशा आशयाचे आणि विविध आयपीसी च्या कलमानुसार गुन्हे दाखल करणार अशा बोर्डाचे बेसुमार पीक आले होते , वास्तविक असे बोर्ड लावणे हे अपेक्षित नव्हते व नाही ,परंतु /तसेच शासनाने कायदे करून जे बोर्ड लावण्यास सांगितले आहेत/ जे फलक दर्शनी भागात लावण्यात सांगितले होते
[ads id="ads2"] ते बोर्ड न लावता शासकीय कर्मचारी व अधिकारी हे जाणीवपूर्वक नागरिकांवर दहशत बसण्याच्या उद्देशाने आयपीसी च्या कायद्याचे व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना एकतर्फी फायद्याचे बोर्ड लावत होते ,यावर शासनाचे बोर्ड काढून टाकण्याचे आदेश झालेले आहेत, तरी आपणास विनंती की अशा पद्धतीचे कोणतेही बोर्ड जर कोणत्याही कार्यालयात आढळले तर कृपया त्या कार्यालयातील तक्रार बुकमध्ये आणि अभिप्राय रजिस्टरमध्ये तात्काळ लिखित स्वरूपात लिहून त्याची तक्रार करावी तसेच संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठांना देखील याबाबत तक्रार द्यावी आणि मेलवर देखील जिल्हाधिकारी किंवा त्या त्या विभागाचे प्रमुख, मंत्रालयातील विभागाचे प्रमुख सचिव यांना तक्रार करावी आणि महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात असे नागरिकांना धमकी वजा इशारा देणारे बोर्ड तात्काळ काढून टाकण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया , भारत हे लोकशाही राष्ट्र आहे तसेच ते प्रजासत्ताक आहे म्हणजे या देशांमध्ये प्रजेची सत्ता आहे, त्यामुळे या देशात नोकरशाही ही एक व्यवस्था आहे ,नोकरशाही सर्वोच्च नाही, प्रजा म्हणजे जनता सर्वोच्च आहे ,जनतेला धमकी देण्याचा उद्देशाने कोणतीही कृती करणे ही गैरलागू आहे ,त्यामुळे सर्वांनी या कडे लक्ष द्यावे , यापुढे कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर असे बोर्ड दिसले तर ते बोर्ड काढण्याबाबत विनंती करावी आणि त्याबाबतची तक्रार द्यावी :-
(दीनानाथ काटकर बार्शी ,मो- 9423332056)